Sunday 10 November 2013

एक विचार सगळ्यांच्या मनातला...!!!

काही गोष्टी खूप अचानकपणे घडतात. आणि बराच वेळ कळतच नाही की काय चाललयं. नक्की काय होणार होतं किंवा काय अपेक्षित होतं यापेक्षा काही वेगळच घडतं. हे सगळ का घडलं याच उत्तर शोधलं की यामध्ये फ़क्त एकच व्यक्ती किंवा एकच गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे आपल मन..... 


प्रत्येकाच्या मनात एखाद्याविषयी काहीना काही  भावना असतेच.... मग ती कुठलीही असो... प्रेम, राग, द्वेष.... पण एखाद्याविषयी असणारी प्रेमाची भावना बदलली आणि तिकडे राग उभा राहीला तर… ? तो राग त्या प्रेमाला ठेवतच नाही.

शेवटी काय महत्वाच ते पुर्वीपासूनचं प्रेम का आत्ता आलेला राग ...??? ते प्रेमच महत्वाच असतं तरी आपल्या डोक्यातला तो राग आपल्याच मनाला रागाची भुरळ घालतो... तर मग त्या रागाला बाजूला सारून आपल मन आपण प्रेमाकडे का वळवू शकत नाही...???

तसच आपला विश्वास सुध्दा हा पण आपल्या जवळच्या व्यक्तिवर  खूप असतो... आणि अचानक आपल्याला त्या व्यक्तिविषयी काही बाहेरून कळलं तर मनाची अस्वस्थता वाढते... ती बाहेरची व्यक्ती तिचा काहीच संबंध नाही... तरी त्यावेळेस त्या व्यक्तीवर आपला सगळ्यात जास्त विश्वास.... आणि नंतर एका जवळच्या व्यक्तीपासून दूर जाण... हे कितपत योग्य असतं??? 

आपल्याला हे माहीत असतं आपण करतोय ते चूकिचे आहे... तरी आपण आपल्या मनाला समजावू शकत नाही.... एकमेकांना जोडलेली दोन मनं एकदम वेगळी होतात... आणि हे सुध्दा प्रत्येक नात्यात होत... ते नातं पहील्या प्रेमाच असो किंवा मैत्रीच.... 


या गोष्टीला अजून काय कारण असू शकेल??? आपल्या मनात असणाय्रा अपेक्षा.... तर मग आपण आपल्या अपेक्षा आपल्याच जवळच्या व्यक्तीबरोबर ठेवल्या तर काय हरकत आहे हा प्रश्न परत मनात आलाच.... शेवटी हा सगळा आपल्या मनाचाच खेळ... या मनाला कस समजवाव हे कळतचं नाही.... आणि आपण आपल्या मनाला फ़सवू पण शकत नाही.... फ़क्त या गोष्टीला आपण वेळ द्यायचा.... कारण आपल्याला सावरायला थोडा वेळ लागतोच.... आपल्या मनाला या सगळ्या गोष्टींची सवय झालेली असतेच... फ़क्त होणारा त्रास सहन करायचा असतो... असं सगळं करण्यापेक्षा आपणच आपल्या मनाला समजवलं तर ??? मनातला राग, अविश्वास, ईगो बाजूला काढला तर ते स्वत:ला त्रास होण्यापेक्षा अधिक चांगल नाही का... प्रत्येक व्यक्ती हि मुळाताच चांगली असते.... फ़क्त आपल्या मनात त्या व्यक्तीच्या बाबतीत काय भावना आहेत ते शेवटी महत्वाचं.....

© ओंकार शिंदे
१० नोव्हेंबर २०१३